
चालकाचे भरधाव बसवरील नियंत्रण सुटल्याने आंध्र प्रदेशात झालेल्या बस-ट्रक भीषण अपघातात 13 जण जागीच ठार झाले. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास आंध्र प्रदेशातील कर्नूल जिह्यातील मदारपूर गावाजवळ ही घटना घडली. या घटनेत चौघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मालट्रक चित्तूर जिह्याकडून हैदराबादच्या दिशेने जात होता. बसमधील सर्वजण राजस्थानातील अजमेरला जात होते होते. दरम्यान, पहाटे चार वाजण्याच्या सुमारास कर्नूल जिह्यातील वेलदुर्ती हद्दीत असलेल्या मदरापूर गावाजवळ बसने विरुद्ध दिशेकडून येत असलेल्या ट्रकला धडक दिली. प्राथमिक अंदाजानुसार चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यानंतर बस समोरून येणाऱया ट्रकला जाऊन धडकली. बस आधी डिव्हायडरला जाऊन धडकली. डिव्हायडर तोडून बस ट्रकवर जाऊन आदळली. बस आणि ट्रकचा वेग प्रचंड असल्याने या भयंकर अपघातात 13 जण जागीच ठार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

























































