
हिंदुस्थानी संघाने मंगळवारी चेन्नईतील दुसऱया कसोटीत इंग्लंडचा 317 धावांनी धुव्वा उडवत चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. टीम इंडियाच्या फलंदाजांनी आणि गोलंदाजांनी दोन्ही डावांत जबरदस्त कामगिरी करीत फिरकी गोलंदाजांना साथ देणारी खेळपट्टी अशी टीका करणाऱयांना चोख उत्तर दिले. रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल व कुलदीप यादवच्या प्रभावी फिरकीपुढे 482 धावांचा पाठलाग करणाऱया गोऱयांचा दुसरा डाव 164 धावांवरच कोसळला. सर्वाधिक धावांनी मिळवलेला हिंदुस्थानचा हा ऐतिहासिक विजय ठरला आहे. घरच्या मैदानावर अष्टपैलू कामगिरी करणारा रविचंद्रन अश्विन सामनावीर ठरला.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानने मायदेशात 21 कसोटी विजय मिळवले. याआधी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालीही ‘टीम इंडिया’ने 21 कसोटी विजय मिळवलेले आहेत. धोनीच्या त्या पराक्रमाशी आज विराटने बरोबरी केली.
आशियाई उपखंडात सलग सहा कसोटी सामने जिंकणाऱया इंग्लंडचा विजयरथ अखेर हिंदुस्थानने रोखला. जो रूटच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघाने श्रीलंका दौऱयावर निर्भेळ यश संपादन केले होते. पहिल्या कसोटीतही हिंदुस्थानला हरवले होते.

























































