
कोरोनाविरोधात महाराष्ट्रभरात राबवण्यात आलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेमुळे राज्यात आज 3 हजार 853 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून रिकव्हरी रेट 95.62 टक्क्यांवर पोहोचला आहे. मात्र, राज्यात कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली असून दिवसभरात 4 हजार 787 कोरोना रुग्णांची नोंद झाली.
कोरोना पार्श्वभूमीवर, राज्यभरात राज्य सरकार आणि नगरपालिका, महानगरपालिकेकडून कोरोना रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. आज दिवसभरात कोरोनामुळे 40 जणांचा मृत्यू झाला तर मृत्यूदर 2.49 वर आला आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनाच्या 1 कोटी 54 लाख 55 हजार 268 चाचण्या झाल्या असून 20 लाख 76 हजार 93 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात सध्या 1 लाख 95 हजार 704 जण होम क्वारंवाईन असून 1 हजार 664 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.
मुंबईतील रुग्णसंख्येत 260 ने वाढ
मुंबईत आज दिवसभरात 421 रुग्ण कोरोनामुक्त झाले असले तरी 721 रुग्ण सापडले असून मंगळवारच्या तुलनेत हा आकडा तब्बल 260 ने वाढला आहे. त्यामुळे मुंबईकरांची चिंता वाढली आहे. दरम्यान, मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधीही कमी झाला असून तो 436 दिवसांवर पोहोचला आहे.
मुंबईतील विविध रुग्णालयात कोरोवर उपचार घेत असलेल्या आणि दीर्घकालीन आजार असणाऱया 3 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याने एपूण मृतांची संख्या 11 हजार 426 वर पोहोचली आहे. मुंबईत कोरोनामुक्त होणाऱयांची एपूण संख्या 2 लाख 97 हजार 522 वर पोहोचली आहे. कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 94 टक्क्यांवर आले आहे तर रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 436 दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत सक्रीय रुग्णांची संख्या 5 हजार 943 वर पोहोचली आहे. दरम्यान, मुंबईत आतापर्यंत 30 लाख 58 हजार 146 चाचण्या झाल्या असून रुग्णांची संख्या 3 लाख 15 हजार 751 वर पोहोचली आहे.



























































