
मराठा आरक्षण प्रश्नावर भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये मराठा आरक्षण तसेच अन्य विषयांवर अर्धा तास चर्चा झाली असून राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावावा, अशी मागणी त्यांनी केली.
मराठा आरक्षणाबाबत आज मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची भेट घेतली व आरक्षणातील काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्री यांनी लवकरच बैठक घेऊन सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.@OfficeofUT https://t.co/d9fMgk75oZ pic.twitter.com/vgAnblBM0i
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) February 17, 2021
भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत भेट घेतली. त्यानंतर बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना मराठा आरक्षणासंदर्भात निवेदन दिले. मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालावे. त्याचप्रमाणे मराठा आरक्षणासंदर्भात काही मुद्यांवर श्वेतपत्रिका काढावी. यामुळे समाजात निर्माण झालेला असंतोष कमी होईल, असे आवाहन उदयनराजे यांनी यावेळी केले.
या मुद्दय़ांवर श्वेतपत्रिका काढा
एसईबीसी उमेदवाराने ईडब्ल्यूएस कोटय़ातून आरक्षण स्वीकारले तर त्याचा सर्वोच्च न्यायालयातील केसवर काही परिणाम होईल का?
मोठय़ा प्रमाणावर ईडब्ल्यूएस आरक्षण स्वीकारले तर त्याचा केसवर परिणाम होणार का?
ईडब्ल्यूएस आरक्षण रद्दबातल ठरवलं तर त्याचा मराठा उमेदवारांवर काही परिणाम होईल का?
महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळ कमिटीने सर्वोच्च न्यायालायातील प्रलंबित खटल्यांसंबंधी जे निर्णय घेतले ते समाजासमोर आले पाहिजेत. जेणेकरुन या खटल्यात सरकारकडून वकिलांना काय निर्देश देण्यात आले याचा खुलासा होईल.
एमपीएससीच्या माध्यमातून निवड झालेल्या 2150 उमेदवारांसाठी सुपर न्युमररी पोस्ट निर्माण करून त्यांना नोकरीत का सामावून घेत नाही?































































