
गणेश जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या महाप्रसादासाठी मित्राला बोलविल्यामुळे टोळक्याने तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार केला. शिवाय तरुणाच्या मित्राला मारहाण केली. ही घटना काल रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास लक्ष्मीनगरमधील गणपती मित्रमंडळासमोर घडली.
याप्रकरणी अमर हजारे (26, रा. लक्ष्मीनगर ) यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. अमर दत्तवाडीतील लक्ष्मीनगरमध्ये राहायला आहेत. गणेश जयंतीनिमित्त अमरने त्यांचा मित्र विक्रम लोंढे याला जेवणाचे आमंत्रण दिले होते. त्याचा राग आल्यामुळे आरोपीने अमरला शिवीगाळ करून कोयत्याने वार केले. त्याशिवाय विक्रम लोंढे याला मारहाण केली. याप्रकरणी पोलीस हवालदार भालेराव तपास करीत आहेत.




























































