
पेट्रोल-डिझेल दरवाढीचा विपरीत परिणाम जनतेच्या मनावर होऊ शकतो. यावर कोल्हापूर जिह्यातील पंपचालकाने भन्नाट कल्पना लढविली आहे. ‘‘स्वतःच्या जबाबदारीवर पेट्रोलचे दर पहावे. छातीत कळ आल्यास पंपमालक जबाबदार राहणार नाही.’’ असा डिजिटल बोर्डच पेट्रोलपंपावर लावला आहे. या बोर्डाची चांगलीच चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. कोल्हापूर जिह्यातील पुलाची शिरोळी येथील पुणे-बंगळुरू महामार्गावर सांगली फाटा येथे हा कोरगांवकर पेट्रोलपंप आहे.
सलग दहाव्या दिवशी दरवाढ
सलग दहाव्या दिवशी इंधन दरवाढ झाली आहे. पेट्रोल 32 पैसे प्रतिलिटर तर डिझेल 34 पैशांनी महाग झाले आहे. देशातील तीन शहरांत पेट्रोलने शंभरी पार केली.
































































