
शिवसेनेचे झुंझार नेते व भारतीय कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष कमांडर दत्ताजी साळवी यांच्या 103व्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवारी त्यांना राज्यभरात विविध ठिकाणी आदरांजली वाहण्यात आली. भारतीय कामगार सेनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष खासदार अरविंद सावंत यांनी दादर येथील कार्यालयात दत्ताजी साळवी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले.
भारतीय कामगार सेनेच्या दादर येथील कार्यालयात शिवसेना तसेच भारतीय कामगार सेनेच्या पदाधिकाऱयांनी दत्ताजी साळवी यांना आदरांजली वाहिली. यावेळी भारतीय कामगार सेनेचे चिटणीस संजय कदम, विजय दळवी, सहचिटणीस सूर्यकांत पाटील, राजा ठाणगे, मिलिंद तावडे, जगदीश निकम, दत्ताजी साळवी यांचे जावई घाग, नातजावई गिरीष सावंत उपस्थित होते. याचबरोबर भारतीय कामगार सेनेच्या हॉटेल तसेच अन्य अस्थापनांतील कार्यालयांत, त्याचप्रमाणे पुणे, संभाजीनगर येथील भारतीय कामगार सेनेच्या युनिटमध्येही दत्ताजी साळवी यांना आदरांजली वाहण्यात आली.

























































