भाजपचा पदाधिकारी निघाला बांग्लादेशी, मुंबई पोलिसांकडून अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजपचा पदाधिकारी बांग्लादेशी असल्याचे समोर आले आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी रुबेल जोनु शेख या व्यक्तीला अटक केली  आहे.

रुबेल जोनु शेख हा उत्तर मुंबई भागाचा भाजपचा अल्पसंख्यांक विभाग प्रमुख होता. गेली 10 वर्षे तो हिंदुस्थानात खोट्या कागदपत्रांवर हिंदुस्थानात राहत होता.

इंडिया टूडेने याबाबत वृत्त दिले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रुबेल शेख हा मूळचा बांग्लादेशचा रहिवासी आहे. शेख 2011 साली पश्चिम बंगालमध्ये घुसला. त्याने पश्चिम बंगालमधील रहिवासी दाखला, जन्म दाखला आणि शाळेचा दाखला बनवून घेतला. पोलिसांने शेखला ताब्यात घेतल्यानंतर सर्व कागदपत्र ताब्यात घेतली आणि त्यांची खातरजमा केली. ही सर्व कागदपत्रे खोटी असल्याचे सिद्ध झाले.

पश्चिम बंगालमधून आल्यानंतर शेख मुंबईत स्थायिक झाला आणि त्याने भाजपचे काम सुरू केले. नंतर मुंबईच्या उत्तर विभागाच्या अल्पसंख्याक विभागप्रमुखपदावर त्याची नेमणूकही करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याला अटक केली. तेव्हा त्याच्याकडे आधार आणि पॅन कार्डही सापडले. पोलिसांनी शेखची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली असून पुढील तपास सुरू आहे.