
>> डॉ. नीलम ताटके
2020 मध्ये कोरोनाने सारं जग ठप्प केलं तरी काही सेवाभावी संस्थांचं काम मात्र सुरूच होतं. कोरोनाकाळात जगातील सर्व दरवाजे बंद झाले तरी मदतकार्याची सेवा मात्र अव्याहत सुरू होती. पुण्यातील गरजूंना मदत करणारी अशीच एक संस्था म्हणजे जनसेवा फाउंडेशन. कोरोना काळात डॉ. विनोद शहा आणि मीना शहा यांनी या संस्थेच्या माध्यमातून पुण्यातील ग्रामीण आणि शहरी भागात अन्न पुरवण्याचे मोलाचे काम केले.
जगरहाटी आपल्या गतीने चालली होती. अचानक कोरोना आला आणि सगळं विश्वच ढवळून निघालं. कोरोनाबाधितांची संख्या वाढत होती तरीही परिस्थिती आटोक्यात होती, पण 17 मार्च उजाडला आणि पुणे, महाराष्ट्र ठप्प झाला. या रोगाने उग्र रूप धारण केले. त्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच गेली आणि परिस्थिती गंभीर झाली. सगळं बंद झालं. काम बंद झालं. ज्यांचं उत्पन्न बऱयापैकी होतं, नियमित होतं, त्यांचं ठीक होतं, पण ज्यांची परिस्थिती आधीच वाईट होती, उत्पन्न अजिबात नाही, त्यांचं काय होणार! त्यांना जेवायचं कसं, आजार होऊ नये म्हणून बालके आणि वृद्ध यांची काळजी कशी घ्यायची ही चिंता!
पुणे शहराच्या बहुतेक सर्व दिशांना असलेल्या वस्त्या, त्यातलं दारिदय़, कुपोषण, रया गेलेलं बालपण, स्त्रियांची स्थिती तर अतिशय वाईट. सततचे गर्भारपण, बाळंतपण या अवस्थेतही काम करणं चुकत नाही. अपुरे खाणं तर कधी खायलाही नाही ही रोजची अवस्था, मग कोरोना काळात बघायलाच नको.
वृद्धांची स्थितीही वाईट. कारण ते तर समाजाला नकोसे झालेले. तरुणांना खायला मिळत नाही, तर या वृद्धांकडे कोण बघणार? साहजिकच ते अन्नासाठी भटकत रहाणार आणि कोरोनाची शिकार होण्याची शक्यता जास्त. शहरी भागात ही अवस्था, तर ग्रामीण भागात परिस्थिती याहून बिकट. हातात पैसे नाहीत, दवाखान्यात जायचे तर तीही सोय नाही. या परिस्थितीत जनसेवा फाऊंडेशन आणि डॉ. विनोद शहा आणि श्रीमती मीना शहा यांनी शहरी व ग्रामीण भागात अत्यंत मोलाचे काम कोरोना काळात केले. फाऊंडेशन इतर वेळीही काम करते. पुण्याच्या विश्रांतवाडी, कात्रज, काsंढवा, वाघोली, स्वारगेट, दापोडी, सांगवी, भोसरी, दांडेकर पूल, पुढारी वस्ती अशा पंधरा वस्त्यांमध्ये सुमारे आठ ते दहा हजार जणांना जेवण दिले. हे जेवण ताजे, गरम आणि पूर्णान्न म्हणजे पौष्टिक आहार दिला. काही काळ त्यांना धान्याचे किट दिले, ज्यात गहू, तांदळापासून तेल, मीठ, मोहरीपर्यंत सगळं काही होतं.
याशिवाय कोरोना काळातील गरज म्हणजे स्वच्छता ठेवणं, मास्क, सॅनिटायझर वापरणं. यासाठी त्यांना याबरोबरच साबण, पेस्ट हे सगळं दिलं. विशेष म्हणजे हे नुसतं देऊन न थांबता त्यांना त्याचं महत्त्व, वापर कसा करायचा हेही सांगितले.
या मदतीचा त्यांना कशा प्रकारे उपयोग झाला हे विचारले असता डॉ. विनोद शहा म्हणाले, आम्ही बऱयाच वस्त्यांमध्ये कामं केली, लोकांना पूर्णान्न, फळं, दिली. त्यांना नाश्ता दिला. मुलांनाही याबरोबरच टोस्ट, बिस्किटे दिली. हे जेवण इस्का@नकडून वारजे, पिंपरी, कात्रज यांच्याकडून आणून दिले. काही काळ होमिओपॅथीच्या गोळ्याही दिल्या. त्यामुळे त्यांच्या अंगात प्रतिकारशक्ती वाढली असेल. वस्तीत कुणालाही कोरोना झाला नाही.
पुढे सांगितलं की, वस्त्यांमध्ये घरं जवळ असल्याने, एका खोलीत जास्त माणसं राहत असल्याने डिस्टन्सिंग पाळणं शक्य नाही. यासाठी इतर गोष्टी पाळणं आवश्यक होतं.
लॉक डाऊनच्या काळात पौरोहित्य करणाऱयांचे काम बंद झालं होतं. त्या पन्नास जणांना धान्याचे किट देऊन त्यांची गरज भागवली.
ग्रामीण भागातून शहरात कामाला गेलेले तिथेच अडकले आणि पुटुंबाची उपासमार होऊ लागली. ही स्थिती पुण्याजवळील गावांमधील आदिवासी पुटुंबाची होती. पुरण खुर्द, कादणे, दापसरे, भिवसी, गोंडखेल, गिवसी, वडघर, आंबेगाव, घोल अशा एकतीस गावांमध्ये संस्थेने धान्याचे किट दिले. शिवाय सुमारे शंभर वृद्ध व्यक्ती, ज्यांना जेवण बनवता येत नाही, त्यांना तयार जेवण, ‘ताईंचा डबा’ या डॉ.नीलम गोऱहे, उपसभापती, विधान परिषद यांच्या उपक्रमातून स्वस्तात जेवण दिले. त्यांनाही मास्क, सॅनिटायझर दिले. कोरोना अजूनही संपलेला नाही, त्यासाठी काय काळजी घ्यायला पाहिजे याविषयी विचारले असता डॉ. विनोद शहा म्हणाले, पालकांनी लस टोचून घ्यायला पाहिजे. लोकांनी अजूनही मास्क, सॅनिटायझर वापरले पाहिजे. डिस्टन्सिंग पाळणं आवश्यक आहे.
हा जगन्नाथाचा रथ पेलायला अनेकांचे हात लागलेत हे निश्चित. समाजातील कार्यकर्ते, वस्तीत काम करणारे, देणगीदार, रोटरीसारखे क्लब…या सगळ्यांविषयी त्यांनी पृतज्ञता व्यक्त केली, परंतु हा काळ कसोटी पाहणारा होता हे नक्की!

























































