#CoronavirusUpdate – केरळ, महाराष्ट्र, पंजाब, छत्तीसगड आणि मध्यप्रदेशमध्ये नवीन रुग्णसंख्येत वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना सक्रीय रुग्णांचा दर आता हिंदुस्थानच्या एकूण बाधित रुग्णसंख्येपैकी 1.30 टक्के इतका आहे. हिंदुस्थानात सक्रीय रुग्णसंख्या आज 1,43,127 इतकी असल्याचे समजते. काही राज्यांमध्ये दैनंदिन नवीन रुग्णसंख्येमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. केरळ, महाराष्ट्र, पंजाब, छत्तीसगड आणि पंजाब या राज्यांमध्ये दैनंदिन नवीन रुग्णसंख्येमध्ये वाढ दिसत आहे.

केरळमध्ये दैनंदिन नवीन रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. गेल्या सात दिवसांमध्ये, छत्तीसगडमध्ये देखील दैनंदिन नवीन सक्रीय रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात, दैनंदिन नवीन रुग्णसंख्येची नोंद 259 इतकी झाली आहे. मागील आठवड्यामध्ये, महाराष्ट्रात दैनंदिन नवीन रुग्णांमध्ये वाढ दिसून आली आहे, तसेच देशात आज सर्वाधिक रुग्णसंख्या देखील या राज्याची आहे. राज्यात गेल्या 24 तासात दैनंदिन नवीन रुग्णसंख्या 6,112 इतकी आहे.

महाराष्ट्राबरोबरच पंजाबमध्ये देखील अचानक दैनंदिन रुग्ण संख्येत गेल्या 7 दिवसात वाढ झाली असून गेल्या 24 तासात 383 इतकी दैनंदिन नवीन रुग्णांची संख्या आहे. 13 फेब्रुवारी 2021 पासून, मध्यप्रदेशमध्ये देखील दैनंदिन नवीन रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यात गेल्या 24 तासात दैनंदिन नवीन संख्या 297 इतकी नोंदविली गेली आहे.

विषाणूच्या संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी आणि रोगाचा प्रसार नियंत्रणात ठेवण्यासाठी कोविड संदर्भातील नियमांचे पालन करण्याचे महत्व पुन्हा एकदा प्रभावीपणे सांगितले जात आहे.

जसे की, चांगल्या दर्जाच्या पायाभूत आरोग्य सुविधा आणि टेस्ट – ट्रॅक – ट्रीट पद्धत यामुळे 21 कोटीपेक्षा अधिक (21,02,61,480) चाचण्या देशभरात घेण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय बाधित रुग्णांच्या संचयी दरामध्ये गेल्या 13 दिवसांमध्ये सातत्याने घट दिसून आली आहे. सध्या तो 5.22 टक्के इतका आहे.

आज सकाळी आठ वाजेपर्यंत आलेल्या अहवालानुसार, एकूण 2,22,313 सत्रांमधून लसीकरणाच्या 1,07,15,204 मात्रा देण्यात आल्या आहेत. यामध्ये 63,28,479 आरोग्य कर्मचारी (पहिली मात्रा), 8,47,161 आरोग्य कर्मचारी (दुसरी मात्रा) आणि 35,39,564 अग्रभागी काम करणारे कर्मचारी (पहिली मात्रा) यांचा समावेश आहे.