येरवड्यात टोळक्याने टेम्पोचालकाला लुटले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टेम्पोतून उसाचे वाढे घेउन वडगाव धायरीकडे जात असताना 8 ते 9 जणांच्या टोळक्याने चालकाला अडवून मारहाण केली. त्यांच्याकडील तीन हजारांची रोकड, मोबाईल मिळून 25 हजारांचा ऐवज लुटून नेला.

ही घटना रविवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास येरवड्यातील फायर ब्रिगेड ऑफिसजवळ घडली. याप्रकरणी तरूणाने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी टेम्पोचालक मित्रासह काल मध्यरात्री सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास येरवडा परिसरातून टेम्पोतून उसाचे वाढे घेऊन चालले होते. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या 8 ते 9 जणांच्या टोळक्याने त्यांचा टेम्पो अडविला.

त्यानंतर टेम्पोचालकाला मारहाण करीत त्याच्याकडील 3 हजारांची रोकड, मोबाईल त्याशिवाय मित्राकडील रोकड मिळून 25 हजारांचा ऐवज घेउन पळ काढला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अमोल वाघमारे तपास करीत आहेत.