गोल्फपटू टायगर वूड्स बचावला; लॉस एंजिलिस येथे भीषण कार अपघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिग्गज गोल्फपटू टायगर वूड्स याचा जीव लॉस एंजिलिस येथे बुधवारी झालेल्या भीषण कार अपघातात थोडक्यात बचावला. टायगर वूड्सच्या दोन्ही पायांना गंभीर इजा झाली असून दोन्ही पायांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. टायगर वूड्स याची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती सोशल साइटवरून देण्यात आली. लॉस एंजिलिस येथील रोलिंग हिल्स इस्टेट व रँचो पालोस येथे टायगर वूड्सच्या कारचा अपघात झाला. त्यानंतर फायर विभाग व मेडिकल विभाग यांनी घटनास्थळी पोहचून टायगर वूड्सला कारमधून बाहेर काढले. टायगर वूड्सच्या कारची डिव्हायडरला धडक लागल्याने हा अपघात घडला. टायगर वूड्सचे पाय कारमध्ये अडकले होते. त्यामुळे त्याच्या पायांनाही दुखापत झाली. या कारमध्ये तो एकटाच होता. तसेच कारचेही मोठे नुकसान झाले आहे.