
रेनॉल्टने स्मार्ट, स्पोर्टी किगर सादर केली आहे. स्मार्ट केबिन तंत्रज्ञान, 1.0 पेट्रोल इंजीन, डय़ुट टोन पर्याय, एअर प्युरिफायर सारख्या स्मार्ट ऍक्सेसरीस अशी या कारची वैशिष्ट्ये आहेत. सहा आकर्षक रंगात उपलब्ध असलेल्या या कारची एक्स शोरूम किंमत 5.45 लाख रुपये इतकी आहे. रेनो लॅंडमार्क हा मुंबईतील रेनॉल्ट इंडियाचा अधिकृत विक्रेता असून त्यांच्या अत्याधुनिक शोरूममध्ये कार खरेदी करता येईल.























































