
दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनांच्या पाठिंब्यासाठी अभिनेता अजय देवगणची गाडी रोखणाऱयाला दिंडोशी पोलिसांनी अटक केली. राजदीप सिंग असे त्याचे नाव असून त्याला बुधवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.
कृषीविधेयकावरून दिल्लीत शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला जगभरातील सेलिब्रेटी, राजकीय नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. या आंदोलनादरम्यान काही बॉलीवूड अभिनेत्यांनी ट्विट केले होते. मंगळवारी सकाळी अजय देवगण हा त्याच्या गाडीतून शूटिंगसाठी फिल्मसिटीत जात होता.
तेव्हा संतोषनगर नाला येथून रिक्षाने जात असणाऱया राजदीपने अजय देवगणची गाडी पाहून तो रिक्षातून खाली उतरला. त्याने अजय देवगणला गाडीतून खाली उतरण्यास सांगितले. शेतकरी आंदोलनाबाबत काही तरी बोल असे सांगून त्याने अजय देवगणची गाडी 5-6 मिनिटे रोखून धरली. त्यानंतर अजय देवगणचे बॉडी गार्ड गाडीतून बाहेर आले. त्याने राजदीपला समजवायचा प्रयत्न केला. पण तो ऐपून घेण्याच्या स्थितीत नव्हता.
या घटनेची माहिती समजताच दिंडोशी पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी राजदीपला ताब्यात घेतले. अजय देवगणच्या बॉडीगार्डने दिलेल्या तक्रारीवरून दिंडोशी पोलिसांनी राजदीप विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. राजदीप हा मूळचा पंजाबचा रहिवासी असून तो मुंबईत रिक्षा चालवण्याचे काम करतो.




























































