धक्कादायक! जेवण बरोबर बनवत नसल्याने दोघांवर फावड्याने हल्ला, एकाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जेवण बरोबर बनवत नसल्याच्या कारणावरून कामगाराने त्याच्या दोन सहकाऱयांच्या डोक्यात फावडा मारल्याची घटना सोमवारी रात्री दहिसर परिसरात घडली. फावडा डोक्यात लागल्याने कालिया नायकचा मृत्यू झाला असून रवींद्र नायकवर उपचार सुरू आहेत. हल्ला करणाऱया बिनोद नायकला दहिसर पोलिसांनी अटक केली. तो सध्या पोलीस कोठडीत आहे.

दहिसर पूर्व परिसरात राजहंस इमारतीचे काम सुरू आहे. त्या ठिकाणी कालिया, रवींद्र, बिनोद आणि एकजण काम करतात. रवींद्र हा जेवण बनवण्याचे काम करतो तर कालिया हा मदतनीस आहे. सोमवारी रात्री बिनोदचा जेवण बनवण्यावरून रवींद्रसोबत वाद झाला. तो वाद मिटल्यावर रात्री चौघेजण झोपले. झोपेत असताना बिनोदने राग डोक्यात ठेवून रवींद्र आणि कालियाच्या डोक्यात फावडा मारला. फावडा मारल्याने ते दोघे जखमी झाले. याची माहिती एका कामगाराने दहिसर पोलिसांना दिली. काही वेळातच दहिसर पोलीस घटनास्थळी आले व त्यांनी कालिया आणि रवींद्रला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तेथे कालियाला डॉक्टरांनी मृत घोषित केले, तर रवींद्रवर सध्या उपचार सुरू आहेत. कालियाच्या हत्येप्रकरणी दहिसर पोलिसांनी बिनोदविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.