संजय राठोडांचा राजीनामा मंजूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून विरोधकांकडून लक्ष्य करण्यात आल्यानंतर संजय राठोड यांनी वनमंत्री मंत्रीपदाचा दिला होता. हा राजीनामा आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंजूर केला.

संजय राठोड यांनी आपल्या वनमंत्रीपदाचा राजीनामा 28 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला होता. त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयामार्फत संजय राठोड यांच्या राजीनाम्याचे पत्र राजभवनावर पाठवण्यात आले होते. यासंदर्भात राजभवनातून प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले. राज्यपाल कोश्यारी यांनी राठोड यांचा राजीनामा मंजूर केला असून संजय राठोड यांच्या खात्याचा कार्यभार मुख्यमंत्र्यांकडे देण्यास मंजुरी दिली.