
अॅमेझॉन प्राईम, नेटफ्लिक्स यांसारख्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरील कंटेटवर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली. काही ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर पोर्नोग्राफी दाखवली जातेय. यावर नियंत्रण आणले पाहिजे, इथे पुठलाही सिनेमा वा शो रिलीज करण्यापूर्वी त्याचे स्क्रिनिंग झाले पाहिजे, त्यासाठी तशी व्यवस्था करा, यासंबंधी नवीन गाईडलाईन्स आधी आम्हाला दाखवा, असे निर्देश न्यायालयाने या वेळी केंद्र सरकारला दिले.
‘तांडव’ वेब सीरिजमधून धार्मिक भावना दुखावण्यात आल्याचा आरोप आहे. याप्रकरणी अॅमेझॉन प्राईमच्या पंटेट हेड अपर्णा पुरोहित यांच्याविरोधात विविध ठिकाणी गुन्हे दाखल केले आहेत. या गुह्यांत अटकेची टांगती तलवार असल्यामुळे पुरोहित यांनी अटकपूर्व जामिनासाठी याचिका केली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली होती. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. त्यांच्या याचिकेवर गुरुवारी न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती सुभाष रेड्डी यांच्या खंडपीठापुढे फक्त दोन मिनिटे सुनावणी झाली. शुक्रवारी पुढील सुनावणी होणार आहे.
- सुनावणीदरम्यान ज्येष्ठ वकील मुपुल रोहतगी यांनी पुरोहित यांची बाजू मांडली. पुरोहित या अॅमेझॉनच्या एक कर्मचारी आहेत. त्या वेब सीरिजच्या निर्मात्या किंवा कलाकार नाहीत. असे असतानाही देशभरातील जवळपास 10 गुह्यांत त्यांचे नाव घेण्यात आले आहे, असे रोहतगी यांनी न्यायालयाला सांगितले.
न्यायालय काय म्हणाले?
- काही ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर वेब सीरिजमध्ये पोर्नोग्राफी दाखवली जातेय ही चिंतेची बाब आहे.
- ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर पुठलाही सिनेमा, वेब सीरिज वा रिऑलिटी शो रिलीज करण्यापूर्वी त्याचे स्क्रिनिंग केले पाहिजे. त्यासाठी तशी व्यवस्था हवी.
- डिजिटल मीडियातील अश्लील कंटेटवर नियंत्रण आणण्याची नितांत गरज आहे.
- कोणत्याही आरोपीला कायद्याचा आदर करावाच लागेल.
- केंद्राने ओटीटी, डिजिटल प्लॅटफॉर्मसंबंधी नियमावली, दिशानिर्देशांचा मसुदा तयार करण्याआधी तो आधी न्यायालयाला दाखवावा.




























































