मुंबई विद्यापीठात महिला नेतृत्वाच्या नव्या दिशा कार्यशाळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई विद्यापीठ बाळासाहेब ठाकरे अध्यासन केंद्राच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त 8 मार्च रोजी एकदिवसीय आभासी कार्यशाळा ‘महिला नेतृत्वाच्या नव्या दिशा’’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

सकाळी 10.30 वाजता ही कार्यशाळा सुरू होणार असून या कार्यशाळेत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱहे, महिला आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र अध्यक्षा ज्योती ठाकरे, सरकारी वकील ऍड. उमा पळसुले-देसाई यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन विद्यापीठाचे प्रकुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्या हस्ते होणार असून या कार्यशाळेचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन युवासेना सिनेट सदस्य शीतल देवरुखकर-शेठ, प्रभारी कुलसचिव डॉ. बळीराम गायकवाड यांनी केले आहे.