येवल्यात काळय़ा गव्हाची शेती!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दुष्काळी तालुका म्हणून येवला तालुका ओळखला जातो. पण हाच तालुका भविष्यात काळ्या गव्हामुळे ओळखला जाईल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मॅग्नेशियम, झिंक अशा गुणांनी उपयुक्त असा काळा गहू नगरसूल शिवारातील प्रशांत सानप या युवा शेतकऱयाने पिकवला आहे. काळ्या मातीत बहरलेली काळ्या गव्हाची शेती पाहून कृषी विभागानेही या शेतकऱयाचे काैतुक केले आहे.

बीएससी अॅग्री पदवीधर असलेला प्रशांत सानप शेतीत नेहमीच नवनवे प्रयोग करत असतो. यावर्षी त्याने एनबीएमजी या गव्हाचे काळे वाण पिकविले आहे. साधारणतः अर्धा एकरात हे पीक त्यांनी

घेतले आहे. नुकतीच तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले, शेतकरी डॉ. कwलास अभंग, अरुण सानप आदींनी या पिकाची पाहणी करून आढावा घेतला व काैतुकही केले.

संशोधनाने मिळाले पेटंट

आहारात जीवनसत्त्व आणि पोषण मूल्यांच्या अभावामुळे अनेक आजार जडतात. त्यामुळे मोहाली संशोधन संस्था नॅशनल अॅग्री फूड बायोटेक्नॉलॉजी इन्स्टिटय़ूट यांनी सात वर्षांच्या संशोधनानंतर गव्हाचे पेटंट घेऊन इतर गव्हाच्या तुलनेत पौष्टिक असलेला काळा गहू विकसित केला आहे.

मी कृषी पदवीधर असल्याने अभ्यासातून या गव्हाची माहिती मिळाली. त्याचे बियाणे उपलब्ध करून मी काळ्या गव्हाचे पीक घेतले. शरीरासाठी अत्यावश्यक असलेले घटक या गव्हातून मिळणार असल्याने नक्कीच भविष्यात हा गहू अधिक प्रमाणात पिकविला जाईल व खाण्यातही वापरला जाईल. – प्रशांत सानप, प्रयोगशील शेतकरी

आरोग्यासाठी फायदेशीर

सर्वसाधारण गव्हामध्ये एंथिसायनिनचे प्रमाण 5 ते 15 टक्के आहे, तर काळ्या गव्हामध्ये हेच प्रमाण 40 ते 140 टक्के प्रति मिलीयम आढळते. तसेच या गव्हामध्ये मॅग्नेशियम, आयर्न, झिंक हे घटक असल्याने ताणतणाव, कॅन्सर, डायबेटीस, लठ्ठपणा आदी आजारांवर हा गहू फायदेशीर आहे.