‘या’ रक्तगटातील लोकांना हृदयविकाराचा धोका असतो अधिक, अभ्यासातून नवी माहिती आली समोर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या म्हणण्यानुसार, आज जगातील सर्वांधीक लोकांच्या मृत्यूचे सर्वात मोठे कारण हृदयाशी संबंधित आजार आहेत. एका नव्या अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की, ज्या लोकांचा रक्तगट ‘ओ’ नाही त्यांना हृदयरोग होण्याचा धोका अधिक असतो.

अलीकडेच झालेल्या संशोधनानुसार, ज्या लोकांना रक्तगट ‘ओ’ नसतो त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त असतो. संशोधकांनी 400,000 पेक्षा जास्त लोकांवर संशोधन केले आणि त्यांना आढळले की रक्तगट ए किंवा बी असलेल्या लोकांमध्ये ओ रक्तगटातील लोकांपेक्षा हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता 8% जास्त असते. अमेरिकन हार्ट असोसिएशन (एएचए) ‘मेडिकल जर्नल्स आर्टेरिओस्क्लेरोसिस, थ्रोम्बोसिस आणि व्हॅस्क्यूलर बायोलॉजी’ मध्ये हे संशोधन प्रकाशित झाले आहे.

युरोपियन सोसायटीने 2017 मध्ये कार्डिओलॉजीद्वारे एक संशोधन केले होते. ज्यामध्ये 13 लाखाहून अधिक लोकांचा समावेश होता. या अभ्यासामध्ये असे आढळले आहे की, ओ रक्तगटाच्या लोकांना हृदयविकाराच्या झटक्यासह हृदयाशी संबंधित आजार होण्याचा धोका 9% जास्त असतो.

एका संशोधनात, संशोधकांनी रक्त गट अ आणि बीची तुलना रक्त गट ओशी केली. या अभ्यासानुसार असे दिसून आले की, बी रक्त प्रकारच्या लोकांना ओ रक्ताच्या प्रकारांपेक्षा 15% जास्त मायोकार्डियल इन्फ्रक्शन (हृदयविकाराचा झटका) धोका जास्त असतो. तसेच ओ रक्तगटाच्या तुलनेत ए रक्तगटाच्या लोकांमध्ये हृदयाच्या विफलतेची शक्यता 11 टक्के जास्त असते.