स्मृतिगंध – आनंदयात्री!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिलीप जोशी

देखणं रूप, विलक्षण बोलका चेहरा, साथीला गळय़ातली सुरेल तान आणि एकूणच व्यक्तिमत्त्वातली प्रसन्नता, सतत साठ वर्षे मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टी गाजवणाऱया श्रीकांत मोघे या चतुरस्र कलावंताच्या जाण्याने मराठी चित्र-रंगभूमीवरचा तेजस्वी तारा अस्तंगत झाला.

देखणं रूप, विलक्षण बोलका चेहरा, साथीला गळय़ातली सुरेल तान आणि एपूणच व्यक्तिमत्त्वातली प्रसन्नता, सतत साठ वर्षे मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टी गाजवणाऱया श्रीकांत मोघे या चतुरस्र कलावंताच्या जाण्याने मराठी चित्र-रंगभूमीवरचा तेजस्वी तारा अस्तंगत झाला.

सांगली जिह्यातल्या किर्लोस्करवाडी येथे 6 नोव्हेंबर 1929 रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचं घराणंच कलासक्त होतं. वडील अभिनय करत असत. आई गाणं म्हणायची. हा वारसा श्रीकांतजींनी पुढे नेला आणि एक प्रभावी अभिनेता म्हणून आपली सहा दशकांची कारकीर्द गाजवली. बालपणापासूनच त्यांच्यावर झालेले संस्कार त्यांचं व्यक्तिमत्त्व खुलवणारे होते. किर्लोस्करवाडीला असताना चित्रकला, शिल्पकला, अभिनय, गाणं आणि त्याचबरोबर भरपूर व्यायाम या सगळय़ांतून एक रुबाबदार अभिनेता घडत गेला.

एकेकाळी म्हणजे 1961 मध्ये आकाशवाणीवर ‘श्रीकांत मोघे आपल्याला बातम्या देत आहेत’, असं ऐकल्याचं आठवतं. त्यावेळी ते अगदी तरुण होते. त्याच काळात त्यांना मामा वरेरकर यांच्या ‘जीवाशिवाची भेट’ या नाटकात काम करायला मिळालं. खासदार असलेल्या मामांचा श्रीकांतवर लोभ होता. 1957 मध्ये दिल्लीला राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद आणि प्रधानमंत्री पंडित नेहरू यांच्या उपस्थितीत सादर झालेल्या ‘और इन्सान देखता रहा’मध्ये त्यांनी नायकाची भूमिका केली. पंडितजींनी त्यांची पाठ थोपटली आणि एका ‘हिरो’चा जन्म झाला.

हिंदी सिनेसृष्टीतही त्यांनी आपला ठसा निश्चितच उमटवला असता असा विश्वास त्यांनाही होता, परंतु मुंबईला आल्यावर त्यांचं मराठी नाटय़-चित्रसृष्टीशी जे अद्वैत घडलं ते कायमचं. आताच्या पिढीला त्यांचा अभिनय पाहायचा असेल तर अनेक चित्रपट आहेत आणि ‘वाऱयावरची वरात’ही आहे. पु. ल. देशपांडे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेल्या ‘वराती’मध्ये पहिल्या संचापासून श्रीकांत मोघे सामील झाले. त्यातला मुंबईच्या सिनेमाची ओढ लागलेला खेडय़ामधला ‘शिरपा’ त्यांनी असा काही रंगवला की, आजही ती चित्रफीत पाहताना हसू येतं.

‘दिल दे के देखो, मुझे मत रोको
मुझे पिला हो एक कप कोको’

अशी भन्नाट रचना आणि त्यावर मोघेंचा ‘चा चा’ डान्स केवळ अप्रतिम! या ‘वरातीतच’ पु. ल. अध्यक्ष असलेल्या समारंभात त्यांचा परिचय करून देणारे बोरावके गुरुजी आणि ‘रविवार सकाळ’मधले कानडी ढंगात ‘उगीच का कांता’ या गाण्यात ‘व्यापूनिया सा।़।़री ध।़ र्र।़।़ण्णी।़’ असा सूर लावणारे कडवेकर मामा जरूर पहा. मजा वाटेल. काही गोष्टी कालातीत असतात. तसंच पुलंचं ते लेखन आणि मोघेंचा त्यातला अभिनय. ‘वाऱयावरची वरात’प्रमाणेच त्यांनी पुलंच्या अंमलदार, तुझे आहे तुजपाशी या नाटकांतल्या भूमिकाही गाजवल्या. बाळ कोल्हटकरांच्या ‘सीमेवरून परत जा’ या नाटकात अलेक्झॅन्डर म्हणून ते शोभले आणि रणजित देसाई व कानेटकरांच्या ‘गरुडझेप’मध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली. त्यांचा रंगमंचावरील सहज वावर, उत्तम संवाद-सादरीकरण प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत असे.

वसंत कानेटकरांच्या ‘लेपुरे उदंड झाली’ या सांगीतिकेत त्यांनी पं. जीतेंद्र अभिषेकी यांच्या संगीत दिग्दर्शनात गद्य-काव्य म्हणावी अशी गाणी गायिली. बऱयाच वर्षांनंतर अपत्यप्राप्ती होणार हे कळल्यावर खुश झालेल्या नायकाची अत्यानंदाने

‘निगा रखो हुश्शार, भाई निगा रखो हुश्शार,
दोन खुळय़ांच्या हातात आता खुळखुळा येणार’

अशा धाटणीची गीतं सादर करताना मोघे रंगमंचावर धमाल करत. हे नाटक त्यांच्या मनात सतत घर करून राहिलं. मराठी सिनेमात ‘प्रपंच’ या चित्रपटात त्यांनी शाहीर अमरशेख साकारत असलेल्या देवा या नायकाचा धाकटा भाऊ झालेल्या शंकरची भावस्पर्शी भूमिका केली होती. ‘शेवटचा मालुसरा’मध्ये शेवटी वीरगती प्राप्त होणारा शूर सैनिक अशा अनेक भूमिका त्यांनी केल्या.

मोघे यांची बहुतेक सगळी नाटपं आणि चित्रपट आम्ही त्या काळात पाहिले. अगदी शेवटी पाहिला तो ‘पुलकित आनंदयात्री’चा रंगलेला प्रयोग. मात्र या ‘दिलखुलास’ व्यक्तिमत्त्वाशी कधी प्रत्यक्ष परिचय होईल असं वाटलं नव्हतं. 2006 मध्ये मी ‘लगे रहो अंतू बर्वा’ हे पुलंनी ‘अमर’ केलेला अंतू बर्वा मला भेटला अशी कल्पना करून लिहिलेलं व्यक्तिचित्र ‘लोकप्रभा’मध्ये प्रसिद्ध झालं. त्यावर काय प्रतिक्रिया येतील याची धास्तीच होती, पण संपादकांपासून ते जगभरच्या अनेक वाचकांनी त्याचं स्वागत केलं. अनेक मान्यवरांनाही ते आवडलं आणि एक दिवस ‘लोकप्रभा’चे तत्कालीन संपादक प्रवीण टोकेकर यांचा पह्न आला, ‘‘श्रीकांत मोघेंना तुमचा अंतू बर्वा आवडलाय. ते आपल्याला भेटायला येतायत.’’ माझ्यासाठी ही फार मोठी गोष्ट होती. पुलंबरोबर सतत पन्नास वर्षे वावरणाऱया, त्यांच्या जवळच्या कलाकार मित्रांपैकी असलेल्या मोघे यांची दाद महत्त्वाची होती.

आमच्या तास-दीड तास छान गप्पा झाल्या. ते म्हणाले, ‘‘फार ‘गोड’ लिहिलंय तुम्ही. कोकणातल्या एका कार्यक्रमात मी तो सादर करतोय.’’ मला आश्चर्याचा धक्काच होता. त्यांनी पुढे विचारलं, ‘‘दीदीनं हे वाचलं का?’’ त्यांच्या दीदी म्हणजे सुनीताबाई. मला काहीच कल्पना नव्हती. मुळात भित भित लिहिलेल्या ‘अंतू’चं एवढं काwतुक, तेही श्रीकांत मोघे यांच्यासारख्याकडून असं कल्पनेतही नव्हतं. ‘‘असंच लिहीत रहा, आम्हाला वाचायला आवडेल’’ ते जाता जाता म्हणाले. मध्ये काही काळ गेला आणि एकदा पह्न आला

‘‘मी श्रीकांत मोघे बोलतोय. ओळखलं का?’’

ओळखलं का?… त्यांच्या आवाजाशी त्यांची भेट होण्यापूर्वीपासूनच मी परिचित होतो.

‘‘हो, ओळखलं ना! काय म्हणताय दादा?’’

‘‘काय, नवीन काय लिहिताय?’’

वास्तविक, पत्रकारिता करताना ललित लेखनाचा योग फारसा येत नाही. तरी थोडंफार लिहिता आलं. त्यात ‘लगे रहो अंतू बर्वा’नंतर
‘… आणि अचानक नंदा प्रधान’ लिहिलं.

‘‘मग ते मला पाठवा…’’ श्रीकांतदादा म्हणाले.

अधेमधे पह्न होत राहिले. वेगवेगळय़ा विषयांवर त्यांच्या खुमासदार शैलीत त्यांची मतं मांडत राहिले. मुलगा शंतनूसुद्धा यशस्वी अभिनेता झाल्याचं त्यांना काwतुक होतं. बोलायला लागले की, भरभरून बोलत. ते ऐकत राहावंसं वाटे. जो तो आपल्या कामाच्या व्यापात असल्यानं पुन्हा भेटायचं ठरवूनही जमत नव्हतं. एकदा मात्र दुपारच्या वेळेस भेट ठरली. मी पुण्याला गेलो. तासभर गप्पागोष्टी करून परतताना जमलं तर थोडं रेका@र्डिंगही व्हावं असं मनात योजून आम्ही त्यांच्याकडे गेलो, पण अचानक महत्त्वाचं काम आल्याने ते घरी नव्हते. पह्नही लागत नव्हता. शेवटी मित्राकडे माझ्या लेखांची कात्रणं देऊन निघालो…आणि गाडी पुणे स्टेशन सोडत असतानाच मिलिंद फणसळकरचा फोन आला, ‘‘अरे, तुम्ही निघालात आणि लगेच ते घरी परतले. तुझी भेट झाली नाही म्हणून त्यांना खूप हळहळ वाटली.’’

मलाही चुटपुट लागली. घरी पोचल्यावर फोन केला,

‘‘चालायचंच, पुन्हा या. मस्त गप्पा मारू. म।़स्त बरं का!’’ ते परिचित स्वरात बोलले.

…पण तेही जमू नये असाच योग असावा. शिवाय गेल्या वर्षभरात तर ‘कोरोना’ने घरबंद केलेल्या जगाचे व्यवहारच थबकले.

…आणि 6 मार्चला श्रीकांत मोघे गेल्याची बातमी आली. नव्वदी पार केलेलं एक संपन्न जीवन आपलंही भावविश्व समृद्ध करून जगाच्या रंगभूमीवरून अंतर्धान पावलं आहे.

z [email protected]