आयआयटी स्थानीय लोकाधिकार समिती कार्यकारिणी जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष, शिवसेना नेते, खासदार गजानन कीर्तिकर आणि महासंघाचे सरचिटणीस, शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई यांच्या संमतीने आयआयटी स्थानीय लोकाधिकार समितीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.

आयआयटी स्थानीय लोकाधिकार समितीच्या अध्यक्षपदी अरुण मांजरेकर, प्रमुख सल्लागारपदी प्रमोद भाताडे, कार्याध्यक्षपदी अशोक कदम तर सरचिटणीसपदी स्वप्नील महाडिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी रमेश दळवी, दिलीप खेडेकर, दिलीप भोसले, संतोष कदम, शरद वझे, संजय भुयाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चिटणीसपदी राजन आगावणे, रवींद्र चिकणे, संतोष शेलार, विक्रांत तांडेल, अजय हिंगे, राजेश ठाकूर, विनोद डोणेकर, सुरेश चव्हाण, सतीश कुंभार, आबासाहेब मोलावणे, सचिन कासार, संतोष आहाडी, श्रीनिवास दासरी, संजय प्रभू, दिलीप खेडेकर यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. खजिनदारपदी राकेश कदम, उपखजिनदारपदी पंढरीनाथ कोरगांवकर, कार्यालय चिटणीस सुधीर ढोबळे, कार्यालय उपचिटणीसपदी कृष्णकांत शिरसाट यांची नियुक्ती केली आहे. महिला चिटणीसपदी प्राची उमरेडकर, राजश्री घेगड, वर्षा सिन्नरकर, साक्षी पवार यांची तर विभागवार संपर्क प्रमुखपदी नरेंद्र खोटरे, मंदार गडग, सुरेश गिते, प्रदीप नायकोडी, आशीष पाटील, प्रवीण नर, किशोर म्हात्रे, चंद्रकांत श्रीवर्धनकर, देवदत्त शिरोळकर, राजेश मांजरेकर, मुकेश फणसेकर, शैलेश म्हात्रे, जितेंद्र नारकर, भगवान सावंत, सौरभ मयेकर, विश्वास प्रभाळे, प्रकाश चोगले, अविनाश सुवारे, उमेश मेजारी, शिवाजी बांगर, हरिश्चंद्र माळी, सुनील मेस्त्री, नामदेव जाधव, दिलीप गांगड, शशांक बस्ताव यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.