
सरकारी बँकांमधील लाखों कर्मचारी सोमवार आणि मंगळवारी दोन दिवसांच्या संपावर आहेत. दोन दिवस सार्वजनिक बँकांच्या खासगीकरणाच्या विरोधात आणि अन्य काही मांगण्यांवरून बँकेचे कर्मचारी संपावर गेले आहेत. या संपात ग्रामीण बँका देखील सहभागी होणार आहेत.
यूनायटेड फोरम ऑफ बँक यूनियन्सचे 10 लाख कर्मचारी केंद्र सरकारच्या धोरणांविरोधाक गेल्या महिन्यापासूनच निदर्शनं करत आहेत. आता 15 आणि 16 मार्च रोजी दोन दिवसांच्या संपावर जाण्याची घोषणा यूनियन्सकडून करण्यात आली आहे. शनिवारी आणि रविवार देखील बँका बंद होत्या, अशाप्रकारे सरकारी बँकांचे कामकाज सलग चार दिव ठप्प राहणार आहे.
ATM-ऑनलाइन सेवेचे काय?
या संपामुळे बँकांच्या विविध शाखांमध्ये पैसे जमा करण्याचे, तसेच काढण्याचे, चेक क्लियरेंस, लोन मंजूरी अशी कामं बंद राहतील. एटीएम सेवा सुरू राहील. तसेच ऑनलाइन ट्रांजॅक्शनचे पर्याय ग्राहकांसाठी खुले असणार आहेत.
ग्राहकांनी 15 आणि 16 मार्च रोजी ब्रँचमध्ये जाण्याऐवजी यूपीआय पेमेंट सर्व्हिसचा वापर करून ट्रांजॅक्शन करावे. घरातून नेट बँकिंग सेवांचा देखील वापर करू शकतात. एटीएम सेवेवर देखील संपाचा परिणाम होणार नाही. म्हणजे तुमच्यासमोर पर्याय उपलब्ध आहेत. प्रत्येक बँकेचं आपलं मोबाइल अॅप आहे. त्याचा वापर देखील ग्राहक करू शकतील.
संपाचं कारण काय?
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प मांडताना IDBI Bank बँकेसह दोन आणखी सरकारी बँकांच्या खासगीजीकरणाची घोषणा केली होती. याचा विरोध बँक कर्मचारी यूनियनकडून विरोध केला जात आहे. आता या विरोधाची धार वाढवण्यात आली असून संपाचं रुप धारण करण्यात आले आहे.
खासगी बँका सुरळीत सुरू
खासगी बँका जसे ICICI, HDFC, कोटक महिंद्रा, इंडस बँक इत्यादी बँकांचे कामकाज सुरळीत सुरू राहणार आहे.




























































