कोरोना झपाट्याने हातपाय पसरतोय.. सावधान! मुंबईसह राज्यात उच्चांक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात बहुतांश ठिकाणी तीव्र उन्हाळा असतो. त्याचा परिणाम कमी लसीकरणावर होऊ शकतो हे गृहीत धरून नागरिकांना दुपारच्या आत किंवा दुपारनंतर व रात्री उशिरापर्यंत लस देण्याची व्यवस्था करावी

राज्यात कोरोनाची उच्चांकी रुग्णसंख्या आज नोंदवली गेली. रुग्णसंख्या वाढत असताना सर्व जिह्यांत कोटेकोरपणे कोरोना निर्बंध पाळा. सहव्याधी असलेले रुग्ण, ज्येष्ठ नागरिक तसेच कोरोना योद्धे या प्राधान्य गटांचे लसीकरण पुढील तीन ते चार महिन्यांत पूर्ण करा, लसीकरणाचा वेग वाढवा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे लसीकरणासंदर्भात विभागीय आयुक्तांसोबत बैठक घेतली. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात दर दिवशी येणाऱया रुग्णांपेक्षा आज रोजीची संख्या उच्चांकी असून राज्यातील जिल्हा प्रशासनाने अतिशय वेगाने रुग्ण आणि त्यांचे संपर्प शोधणे, निर्बंधांचे आणि  आरोग्य नियमांचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले.  यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव सीताराम पुंटे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बदलत्या लक्षणांची नोंद घ्या

कोरोना विषाणूच्या बदलत्या लक्षणांची नोंद वैद्यकीय तज्ञांनी घ्यावी. त्यानुसार आवश्यक त्या उपचार पद्धतीविषयी राज्यातील डॉक्टरांना मार्गदर्शन करण्यात यावे, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केल्या.

एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात 3 लाख रुग्णसंख्या गाठणार

17 सप्टेंबर 2020 रोजी असलेल्या रुग्णसंख्येपेक्षा उच्चांकी संख्या गाठली असून अशीच वाढती संख्या राहिल्यास एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात 3 लाख सक्रिय रुग्ण राज्यात होऊ शकतात. त्यामुळे सर्वांनी प्राधान्याने आरोग्याचे नियम पाळणे आवश्यक असल्याचे मत आरोग्य प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी यावेळी मांडले.

दररोज 3 लाख लोकांना लस द्यायलाच हवी

राज्यात 134 खासगी रुग्णालयांना बुधवारी पेंद्राने लसीकरणासाठी मान्यता दिली असल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली. कोविड लसीकरणात महाराष्ट्र हा संपूर्ण देशात राजस्थाननंतर दुसऱया क्रमांकावर असल्याची बाब समाधानकारक आहे मात्र दर दिवशी 3 लाख लस दिली पाहिजे या दृष्टीने नियोजन करण्याचे त्यांनी आरोग्य विभागास सांगितले.

लस वाया जाऊ देऊ नका

मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्रात इतर काही राज्यांच्या तुलनेत लस विविध कारणांमुळे वाया जाण्याचे प्रमाण खूप कमी आहे. काही राज्यांत 20 टक्क्यांपर्यंत लस वाया जाते, मात्र महाराष्ट्रात हे प्रमाण केवळ 6 टक्के आहे तेदेखील शून्यावर आले पाहिजे. पेंद्र सरकारने दिलेल्या नियमांप्रमाणेच लसीकरण झाले पाहिजे हे पाहावे.

पुन्हा एकदा कंत्राटी तत्त्वावर वैद्यकीय कर्मचाऱयांची भरती – राजेश टोपे

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी संसर्ग असो किंवा लसीकरण, दोघांच्या बाबतीत अधिक मोठय़ा प्रमाणावर स्थानिक पातळीवर लोकांमध्ये जनजागृती करावी असे सांगितले. राज्यात एकवेळ होती जेव्हा दिवसाला केवळ 2 हजार रुग्ण येत होते. आता गंभीर परिस्थिती निर्माण होत आहे. त्या दृष्टीने परत एकदा तात्पुरत्या व कंत्राटी स्वरूपात वैद्यकीय कर्मचारी व सहायक नियुक्त करा तसेच बेड्सची जादा संख्या कशी उपलब्ध राहील याचे नियोजन करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री टोपे यांनी दिले.