
मुंबईकरांना आता लसीकरण केंद्रांवर थेट जाऊन लस घेता येणार आहे. कोविन अॅपवरून येणाऱया मेसेजची वाट पाहत राहावी लागणार नाही. नोंदणी केलेली नसली तरी लसीकरण केंद्रावर आवश्यक प्रक्रिया पार पाडून लस दिली जाणार आहे. शासकीय, पालिका आणि खासगी अशा एकूण 59 केंद्रांवर लस घेता येणार आहे.
देशात 16 जानेवारीपासून लसीकरण सुरू झाल्यानंतर पहिल्या टप्प्यातील आरोग्य कर्मचारी, दुसऱया टप्प्यातील फ्रंटलाइन वर्कर आणि 45 ते 59 वयोगटातील सहव्याधी असणारे आणि 60 वर्षांवरील ज्येष्ठांचे लसीकरण सुरू आहे. यामध्ये लसीकरणासाठी लाभार्थ्यांना कोविन ऍपमध्ये नोंदणी करणे बंधनकाक होते. ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर मेसेज आल्यानंतर पुढील प्रक्रिया पार पाडली जात होती. मात्र कोविन अॅपमधील तांत्रिक अडचणींमुळे लसीकरणाला फटका बसत होता. त्यामुळे थेट लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये कोविन अॅपवर नोंदणी केल्यानंतर थेट लसीकरणासाठी जावे किंवा लसीकरण केंद्रावर नोंदणीची व्यवस्था असेल. यामध्ये शासकीय आणि पालिकेच्या लसीकरण केंद्रावर मोफत तर खासगी केंद्रांवर 250 रुपयांत लस दिली जात आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. दरम्यान, मुंबईत दररोज 1 लाख लसीकरण करण्यासाठी पालिकेने आणखी 29 खासगी सेंटर्ससाठी केंद्राकडे परवानगी मागितली आहे.
दहिसर चेकनाका केंद्राची महापौरांकडून पाहणी
पालिकेच्या आर/उत्तर विभाग दहिसर चेकनाका येथील कोविड सेंटरची महापौर किशोरी पेडणेकर यांनी पाहणी करून आढावा घेत ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला. ज्येष्ठ नागरिक आणि इतर लाभार्थ्यांसाठी जादा सुविधा द्या असे निर्देश यावेळी महापौरांनी दिले. यावेळी आमदार विलास पोतनीस, उपमहापौर अॅड. सुहास वाडकर, नगरसेविका शीतल म्हात्रे, नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद, उपायुक्त विश्वास शंकरवार, उपविभागप्रमुख, सिनेट सदस्य शशिकांत झोरे आदी उपस्थित होते.
खोपोली येथील रमाधाम कृद्धाश्रमाचे अध्यक्ष चंदूमामा वैद्य यांनी शनिवारी नायर रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लस घेतली. त्यांना कोक्हॅक्सिन लसीचा डोस देण्यात आला. कोकिडचा संसर्ग टाळण्यासाठी लस घ्यावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.





























































