
देशातील काही राज्यांमधे रुग्णवाढीचा वेग दररोज झपाटयाने वाढत आहे. महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेशात गेल्या चोवीस तासात 77..7% नवीन रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या 24 तासांत 43,846 नवीन रुग्णसंख्या नोंदली गेली. नवीन प्रकरणांपैकी 83.14% प्रकरणे 6 राज्यांमधील आहेत.
महाराष्ट्रात दैनंदिन रुग्णवाढीचे प्रमाण कायम आहे. इथे गेल्या चोवीस तासात 27,126 रुग्ण आढळले. त्या पाठोपाठ पंजाबात. 2,578 तर केरळमधे 2,078 नवे रुग्ण आढळले आहेत. दुसरीकडे, हिंदुस्थानात बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 1,11,30,288 आहे. तर रुग्ण बरे होण्याचा दर 95.96% आहे. गेल्या 24 तासांत 22,956 रुग्ण बरे होऊन घरी परतले.
नवीन रुग्ण मृत्यूंमध्ये सहा राज्यांचे प्रमाण 86.8% आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यू (92) झाले आहेत. पंजाबमध्ये 38 तर केरळमध्ये 15 मृत्यूची नोंद झाली आहे.
























































