
बीड जिल्ह्यामध्ये गेल्या आठवडाभरामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रूग्ण आढळून येत आहेत. कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे. कोरोना रोखण्यासाठी प्रशासना गंभीर आहे. मंगळवारी झालेल्या बैठकीत बीड जिल्हात 10 दिवसांसाठी लॉकडाऊन करण्याचा प्रशासन विचार करत आहे. परवापासून 10 दिवसासाठी बीड जिल्हा लॉकडाऊन करण्याचा प्रशासनाचा विचार असल्याची माहिती मिळाली आहे.
बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा प्रकोर वाढत आहे. शहरासह ग्रामिण भागात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. बीड आणि अंबाजोगाई तालुक्यात परिस्थिती चिंताजनक आहे. कोरोनामुळे मृत्युदरही वाढत आहे. त्यामुळे कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाची महत्वपूर्ण बैठक झाली. बीड जिल्ह्यात 10 दिवसांसाठी लॉकडाऊन करण्याबाबत प्रशासन निर्णय घेणार आहे. हा 10 दिवसांचा लॉकडाऊन परवा रात्रीपासून लागू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.




























































