आमीर खान कोरोना पॉझिटिव्ह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलिवूडचा मिस्ट परफेक्शनिस्ट आमीर खान याला कोरोनाची लागण झाली आहे. आमीरने स्वत:ला घरातच क्वारंटाईन केले आहे. त्याची प्रकृती उत्तम असल्याचे त्याच्या प्रवक्त्याने सांगितले आहे. तसेच गेल्या काही दिवसात त्याच्या संपर्कात आलेल्यांनी स्वत:ची चाचण करून घ्यावी असे आवाहन आमीर खानने केले आहे.

गेल्या काही दिवसात बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. अभिनेता मनोज बाजपेयी, सतीश कौशिक, कार्तिक आर्यन, रणबीर कपूर, तारकलाल फेम मयुर वाकाणी यांना कोरोनाची लागण झाली आहे.

सोशल मीडियाला केला रामराम

मिस्टर परफेक्शनिस्ट अशी बिरुदावली मिरवणाऱ्या अभिनेता आमीर खान याने रविवारी आपला वाढदिवस साजरा केला. आमीर खानचे चाहते जगभरात पसरले असले तरी त्याला स्वतःला प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची आवड नाही. त्यामुळेच वाढदिवसाचं निमित्त साधून त्याने सोशल मीडियाला रामराम ठोकला.