तेजपाल बलात्कार प्रकरणाचा 27 एप्रिलला निकाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘तहेलका’ मासिकाचे माजी मुख्य संपादक तरुण तेजपाल आरोपी असलेल्या बलात्कारप्रकरणी गोव्याचे सत्र न्यायालय येत्या 27 एप्रिलला निकाल देणार आहे. तेजपाल यांनी गोव्यातील पंचतारांकित हॉटेलातील मुक्कामात आपल्यावर बलात्कार केला असा आरोप तेजपाल यांच्याच महिला सहकारी पत्रकाराने 2013 मध्ये केला होता. पणजीच्या अतिरिक्त आणि जिल्हा सत्र न्यायधीश क्षमा जोशी यांनी 8 मार्चला तेजपालप्रकरणी अंतिम सुनावणी पूर्ण केली आणि या प्रकरणाच्या निकालाची घोषणा 27 एप्रिलला केली जाईल असे सांगितले. या बलात्कारप्रकरणी गोवा पोलिसांनी तेजपाल यांच्याविरोधात 2,846 पानी आरोपपत्र तयार केले आहे. या प्रकरणात न्यायालयाने 71 साक्षीदारांच्या जबान्या घेतल्या आणि बचाव पक्षाच्या 5 साक्षीदारांचेही म्हणणे ऐकून घेतले आहे.