जम्मू कश्मीरमध्ये चकमक; दोन दहशतवादी ठार, एक जवान शहीद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फाईल फोटो

जम्मू कश्मीरमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाली असून एक जवान शहीद झाला आहे.

शनिवारी जम्मू कश्मीरच्या शोपियां जिल्ह्यात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली. तेव्हा हिंदुस्थानी जवानांनी या भागात शोध मोहीम राबवली. तेव्हा दहशवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल जवानांनीही दहशतवाद्यांवर गोळीबार केला. या चकमकीत दोन दशतवादी ठार झाले आणि एक जवान शहीद झाला. मृत दहशतवाद्यांकडून जव्वानाने मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. मृत दहशतवाद्यांची ओळख पटलेली नसून पुढील तपास सुरू आहे.