सना खानने बुर्ज खलिफामध्ये घेतला गोल्ड प्लेटेड कॉफीचा आनंद, पाहा फोटो

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलिवूडला रामराम ठोकून नंतर एका मौलवीशी लग्न करणारी अभिनेत्री सना खान ही सध्या तिच्या सोशल लाईफमुळे कायम चर्चेत असते. सध्या सना दुबईला सुट्टीचा आनंद घेत आहे. यावेळी ती नवऱ्यासोबत बुर्ज खलिफा या जगातील सर्वात उंच बिल्डिंगमध्ये गेली होती. तिथे तिच्या नवऱ्याने तिच्यासाठी एक सरप्राईज ब्रेकफास्ट तयार ठेवला होता. त्या ब्रेकफास्टमध्ये चक्क सोन्याचे वर्ख असलेल्या कॉफीचा समावेश होता. जगातील सर्वात महागड्या कॉफीचे फोटो सनाने तिच्या सोशल अकाऊंटवर शेअर केले आहेत.

बिग बॉस या रिअॅलिटी शोमधून चर्चेत आलेल्या सनाने गेल्यावर्षी गुजरातचे मौलवी अनस सईद यांच्यासोबत लग्न केले. लग्नाआधीच तिने बॉलीवूड सोडण्याचा निर्णय घेत धार्मिक मार्ग स्वीकारलेला. तीने तिचा ग्लॅमरस अवतार बाजूला ठेवत ती आता हिजाब परिधान करते. बॉलिवूडमध्ये काम करणं थांबवलं असले तरी सोशल मिडीयावर ती सतत अॅक्टीव्ह असते.

बुर्ज खलीफा येथे 24 कॅरेट गोल्ड प्लेटेड कॉफी 3600 रुपयांना मिळते. सकाळी सकाळी पती मुक्ती अनस सैय्यद यांनी दिलेले हे खास सरप्राईज पाहून सनाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. मात्र या फोटोमुळे ती ट्रोलही झाली आहे. मौलवी यांच्यासोबत लग्न झाल्यावर सातत्याने तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.