निवडणूक आयोग, केंद्रीय सुरक्षा यंत्रणा अमित शहांच्या इशाऱयावर काम करताहेत – ममता बॅनर्जी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत नंदीग्राममध्ये आज मतदानावेळी भाजप आणि तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले. काही ठिकाणी दगडफेक आणि हिंसक घटना घडल्या. निवडणूक आयोग आणि केंद्रीय सुरक्षा यंत्रणा गृहमंत्री अमित शहांच्या इशाऱयावर काम करीत आहेत, असा आरोप मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये दुसऱया टप्प्यात सरासरी 81 टक्के तर आसाममध्ये 77.21 टक्के मतदान झाले.

पश्चिम बंगाल विधानसभेच्या 294 जागांसाठी तब्बल आठ टप्प्यात मतदान होत आहे. 27 मार्चला पहिला टप्पा झाला. आज दुसऱया टप्प्यात बंकुरा, दक्षिण 24 परगणा, पूर्व मिदनपूर आणि पश्चिम मिदनपूर या चार जिह्यांतील 30 मतदारसंघांत मतदान झाले. सर्वच मतदान केंद्र संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आले होते. सीआरपीएफ, बीएसएफ या केंद्रीय सुरक्षा यंत्रणांचा मोठा बंदोबस्त तैनात होता. तरीही हिंसाचार भडकलाच.

मतदान पेंद्रावर ममता बॅनर्जींचा दोन तास ठिय्या

  • तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भाजपचे सुवेंदू अधिकारी यांच्यात बिग फाईट असल्याने नंदीग्राममध्ये मोठा बंदोबस्त तैनात केला होता. तरीही हिंसाचार भडकला.
  • नंदीग्राममध्ये भाजपकडून बूथ कॅप्चरिंग होत असल्याची तक्रार मिळताच ममता बॅनर्जी संतप्त झाल्या. बूथ क्रमांक 7 येथे त्यांनी व्हिलचेअरवर दोन तास ठिय्या मांडला. या मतदान केंद्राबाहेर भाजपच्या कार्यकर्त्यांनी घेराव टाकल्याचा आरोप त्यांनी केला. केंद्राबाहेर तृणमूल आणि भाजपचे कार्यकर्ते भिडले. दगडफेक करण्यात आली.
  • तृणमूल आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये घोषणाबाजी झाली.
  • नंदीग्राममधील अनेक मतदान केंद्रांबाहेर भाजप आणि तृणमूलचे कार्यकर्ते आमने-सामने आले.
  • भाजपने 150 ईव्हीएम मशीन्समध्ये गडबड केल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी केला.
  • दुसऱया टप्प्यात भाजपकडून बूथ कॅप्चरिंग आणि ईव्हीएममध्ये गडबड केली गेली,असे तृणमूलचे नेते डेरेक ओ ब्राइन यांनी म्हटले आहे.
  • भाजप उमेदवार सुवेंदू अधिकारी यांनी आपल्या गाडीवर दोनवेळा दगडफेक झाली, तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी घेराव घातला, असा आरोप केला.
  • केशपूर मतदारसंघात भाजपचे उमेदवार तन्मय घोष यांची गाडी फोडण्यात आली.

दिवसभरात 63 तक्रारी; निवडणूक आयोग म्हणते मतदान शांततेत!

भाजपकडून मतदानात अडथळा आणला जात आहे. निवडणूक प्रक्रिया योग्यरीतीने पाळली जात नाही अशा तब्बल 63 तक्रारी आज दिवसभरात निवडणूक आयोगाकडे केल्याचे ममता बॅनर्जी यांनी सांगितले. मात्र, निवडणूक आयोगाने नंदीग्रामसह 30 मतदारसंघांत शांततेत मतदान झाले, असा दावा केला आहे. आयोगाचे निरीक्षक हेमीन दास आणि आशुतोष रॉय या दोघांकडून अहवाल मागविला आहे. नंदीग्रामच्या बूथ क्रमांक सात येथे कोणताही अडथळा झालेला नाही, असे आयोगाने म्हटले आहे.

जनताच भाजपला उत्तर देईल – ममता

  • सीआरपीएफ, बीएसएफ या पेंद्रीय सुरक्षा यंत्रणा तसेच, निवडणूक आयोग हे गृहमंत्री अमित शहा यांच्या इशाऱयावर काम करीत आहेत. या यंत्रणा भाजपला मदत करीत आहेत, असा आरोप मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषदेत केला. 63 तक्रारीनंतरही आयोगाकडून काही कारवाई होत नसेल तर आम्हाला न्यायालयात जावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला.
  • भाजपने इतर राज्यातील गुंड लोक येथे आणले आहेत. भाजपच्या दडपशाडीला पश्चिम बंगालची जनता घाबरणार नाही. मतदानातून जनताच भाजपला उत्तर देईल, असे त्या म्हणाल्या.
  • नंदीग्राममध्ये माझा विजय निश्चित आहे. 90 टक्के मतदारांनी तृणमूल काँग्रेसला मतदान केले आहे. इतर मतदारसंघातही आमचाच विजय होईल, असा विश्वास ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केला.

मतदान पेंद्रावरूनच ममता यांचा राज्यपालांना फोन

मतदान पेंद्र क्रमांक सात येथे व्हिलचेअरवर ममता बॅनर्जी दोन तास ठिय्या मांडून होत्या. तेथूनच ममता यांनी राज्यपाल जगदीप धनकर यांना पह्न करून मतदान प्रक्रियेत भाजपकडून अडथळा आणला जात आहे. केंद्रीय सुरक्षा यंत्रणांकडून योग्य कारवाई केली जात नाही, अशी तक्रार केली.