कलाकार पोहोचले चाहत्यांच्या घरी!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मालिकेमुळे चाहते त्यांच्या लाडक्या कलाकारांना दररोज भेटतात. पण या कलाकारांची प्रत्यक्ष भेट व्हावी ही इच्छा प्रत्येक चाहत्याच्या मनात असते. कोरोनाच्या संकटामुळे प्रत्यक्ष भेट घेणे शक्य नसल्यामुळे स्टार प्रवाहने चाहत्यांसाठी एक अनोखी संधी उपलब्ध करून दिली. ऑगमेंटेड रिऑलिटी या तंत्रज्ञानाच्या मदतीने चाहत्यांना घरबसल्या स्टार प्रवाहच्या परिवाराला आभासी भेटता आले.

इतकेच नाही तर या परिवारासोबतच्या भेटीचा क्षण कॅमेरातही कैद करण्याची संधी मिळाली. मराठी टेलिव्हिजनवर असा प्रयोग आजवर कधीच झालेला नाही. त्यामुळे चाहत्यांकडून या अनोख्या उपक्रमाचे कौतुक होत असून या आभासी भेटीचा आनंद चाहत्यांसाठी अनोखी पर्वणीच ठरला आहे.