
ममी हे इजिप्त देशाचे वैशिष्टय़. हजारो वर्षांपासून तिथले ममी स्वतःचे वेगळेपण टिकवून आहेत. त्यांच्याभोवती असलेले गूढतेचे वलय त्यांच्या वेगळेपणात आणखी भर घालतात.
या ममीवर सतत संशोधन सुरू असते. आताही 2600 वर्षे जुन्या ताकाबुती ममीविषयी संशोधकांना महत्त्वाची माहिती मिऴाली आहे. ही एका महिलेची ममी असून पाठीत कुऱहाड घालून तिची हत्या करण्यात आली होती, असे संशोधनातून समोर आलंय.
ताकाबुती ममीची हत्या चाकूने करण्यात आली होती, असा निष्कर्ष याआधीच्या संशोधनातून काढण्यात आला होता. मात्र आता तिची हत्या कुऱहाडीने झाल्याचे समजते. प्राचीन इजिप्तमध्ये राहणारी ही एक उच्चकुलीन स्त्राr होती, पण तिच्या हत्येचे कारण अजूनही उलगडलेले नाही. 1834 पासून या ममीवर संशोधन सुरू आहे.
संशोधनातून काही गोष्टी समोर आल्या आहेत. हत्या करण्यासाठी कुऱहाडीसारखे हत्यार वापरले होते. तसेच कुऱहाडीचा वार खूप लांबून करण्यात आला होता. ही स्त्राr जेव्हा स्वतःला वाचविण्यासाठी धावत होती तेव्हा मागून हा वार करण्यात आला. मृत्यूसमयी या महिलेचे वय 20 ते 30च्या दरम्यान असावे, अशा बाबी नव्या संशोधनातून उघड झाल्या आहेत. या संपूर्ण संशोधनावर एक पुस्तकच निघाले आहे.



























































