बिल्कूल रिक्स नही लेने का! निकालापूर्वीच काँग्रेसने आपल्या उमेदवारांना जयपूरला हलवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील पाच राज्यांपैकी चार राज्यातील मतदान संपले आहे. आता काँग्रेस निकालानंतरच्या तयारीला लागली असून आपल्या उमेदवारांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. निकालानंतर भाजप घोडेबाजार करेल किंवा आमदार पळवून नेतील म्हणून काँग्रेसने कुठलाही धोका न पत्करण्याचे ठरवले आहे.

आसाममध्ये यंदा भाजप आणि काँग्रेसमध्ये तगडी टक्कर आहे. आसाममधील मतदान संपन्न झाले असून काँग्रेसने आपल्य उमेदवारांना जयपूरच्या फेयरमोन्ट हॉटेलमध्ये हलवले आहे.

काँग्रेस उमेदवारांसोबत AIUDF चे उमेदवारही जयपूरमध्ये पोहोचले आहेत. यावेळी AIUDF ने काँग्रेससोबत निवडणूक लढवली आहे. आसाम विधानसभा निवडणुकीसाठी तीन टप्प्यांत मतदान पार पडले होते.

निकालानंतर भाजप काँग्रेस आमदारांना तोडण्याचा प्रयत्न करेल म्हणून त्यांना जयपूरला नेण्यात येत आहे अशी माहिती काँग्रेसच्या नेत्यांनी दिली आहे. काँग्रेस इतर राज्यांच्या उमेदवरांनाही अशाच प्रकार सुरक्षित ठेवण्याच्या तयारीत आहे असे म्हटले जाते.