
देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनची अपरिहार्य स्थिती या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विविध राज्यांतील राज्यपालांशी 14 एप्रिल रोजी संवाद साधणार आहेत. या ऑनलाईन संवादात केंद्रशासित प्रदेशांतील उपराज्यपालही सहभागी होणार आहेत.
देशात कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये परिस्थिती हाताबाहेर चालली आहे. लॉकडाऊनशिवाय कोरोनाची साखळी तोडणे अशक्य होऊन बसले आहे. कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी नुकताच विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला होता. कोरोनाला आळा घालण्यासाठी लॉकडाऊनचा उपाय करण्यास पंतप्रधान मोदींनीही त्या बैठकीत काही ठोस सांगितले नव्हते. त्याऐवजी चाचण्या वाढवण्यास आणि कंटेनमेन्ट झोन बनवण्यास त्यांनी अधिक भर दिला होता.
देशातील 70 टक्के कोरोनाबाधित पाच राज्यांमध्येदेशातील 70 टक्के कोरोनाबाधित रुग्ण हे पाच राज्यांमधील आहेत. त्यात महाराष्ट्र, छत्तीसगढ, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि केरळचा समावेश आहे. विधानसभा निवडणूक असलेल्या पश्चिम बंगालमध्येही आता कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.



























































