शरद पवार यांना दोन दिवसांत डिस्चार्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पित्ताशयावरील शस्त्रक्रियेसाठी सोमवारी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावरील शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती झपाटय़ाने सुधारत असून येत्या दोन दिवसांत शरद पवार यांना डिस्चार्ज दिला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांची रुग्णालयात भेट घेतली. त्यानंतर अजित पवार यांनी त्यांच्या डिस्चार्ज विषयीची माहिती पत्रकारांना दिली. 30 मार्च रोजी शरद पवार यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर सोमवारी पुन्हा त्यांच्यावर दुसरी शस्त्रक्रिया करण्यात आली. ही लेप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. त्यांची प्रकृती सुधारत असून त्यांना पुढील दोन दिवसांत रुग्णालयातून घरी पाठविण्यात येईल, असे अजित पवार यांनी सांगितले.