सलमानच्या ‘राधे’चा ईदला डबल धमाका, एकाचवेळी थिएटर आणि ओटीटीवर होणार प्रदर्शित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेता सलमान खानच्या राधे या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहणाऱया प्रेक्षकांसाठी गुड न्यूज आहे. ‘राधे’ हा चित्रपट ठरल्याप्रमाणे ईदलाच म्हणजे 13 मे रोजीच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी चित्रपटाचे पोस्टर शेअर करत ही माहिती दिली आहे.

या पोस्टरवर ‘भाई का कमिटमेंट, ईद पे एंटरटेन्मेंट’ असे लिहिले आहे. त्यासोबत एकाचवेळी हा चित्रपट जगभरातील थिएटर आणि झी प्लेक्स या ‘पे पर ह्यू’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर चाहत्यांना पाहता येणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. डिश टीव्ही, टाटा स्काय, एअरटेल येथेही हा चित्रपट पाहता येणार आहे. अर्थातच त्यासाठी पैसे मोजावे लागतील. गेल्या वर्षी ईदला हा चित्रपट प्रदर्शित होणार होता, मात्र लॉकडाऊनमुळे या चित्रपटाचे शूटिंग रखडले होते. ‘राधे’ हा चित्रपट ईदला थिएटरमध्येच रिलीज करावा, अशी मागणी थिएटरचालकांनी सलमानला केली होती. अखेर सलमाननेदेखील आपला शब्द पूर्ण केला आहे.