
महाराष्ट्र राज्यात जवळपास ६० लाख नोंदणीकृत कामगार वर्ग असून त्यांच्या कुटुंबीयांची म्हणजेच लाभार्थ्यांची संख्या २ कोटींच्या आसपास आहे. या सर्वांना कोविडची मोफत लस द्यावी, अशी मागणी ई.एस.आय.सी. आणि ई.पी.एफ. बेनिफिशरीज वेलफेअर ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त शंकर लोके यांनी केली आहे. तर राज्यामध्ये कामगार राज्य विमा महामंडळाला मोठमोठ्या उद्योजकांकडून त्यांच्या आवारात जागा मिळवून त्या ठिकाणी चिकित्सालय, लस केंद्र आणि शाखा कार्यालय कार्यान्वित करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. त्याबरोबर कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना फिरत्या दवाखान्यांची सोय उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.
























































