आईच्या गावात,पिचकारी बाराशेच्या भावात! सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 1200 रुपये दंड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सार्वजनिक ठिकाणी थुंकणे कोरोनासारख्या अनेक आजारांना निमंत्रण ठरत असल्याने अशा ‘पिचकारी’ बहाद्दरांना सध्या 200 रुपये करण्यात येणारा दंड 1200 रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय पालिका घेणार आहे. याबाबत प्रस्ताव तयार करण्यात आला असून पुढील कार्यवाहीसाठी आयुक्तांकडे पाठवण्यात आला आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाने हा प्रस्ताव आयुक्तांकडे सादर केला असल्याची माहिती उपायुक्त (विशेष) संजोग कबरे यांनी दिली.

मुंबईत सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना प्रत्येकाने खबरदारी घेणे गरजेचे आहे, मात्र अनेकजण याकडे दुर्लक्ष करीत असल्याने कोरोना पसरण्याला हातभार लागत आहे. याच पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरल्यास 200 रुपये दंड आणि थुंकणाऱयांकडूनही 200 रुपये दंड आकरण्यात येत आहे. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने अलीकडेच पालिकेला ‘कायद्यात तरतूद असताना सार्वजनिक ठिकाणी, उघडय़ावर थुंकणाऱयांकडून 1200 रुपयांचा दंड का आकारत नाही? असा सवाल केला होता. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने 200 रुपयांचा दंड 1200 करण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे. आयुक्तांच्या मंजुरीनंतर महापालिकेची मंजुरी आणि नंतर नगर विकास खात्याच्या मंजुरीनंतर याची अंमलबजावणी होणार आहे. दरम्यान, विनामास्क फिरणाऱयांवर सध्या करण्यात येणारा 200 रुपयांचा दंड वाढवण्याबाबत सध्या तरी विचार नसल्याचेही पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

न्यायालय काय म्हणाले!

  • सार्वजनिक ठिकाणी थुंकाणाऱयांमुळे अनेक आजार पसरण्यास हातभार लागत असताना योग्य प्रकारे दंड आकारला जात नसल्याचे सांगत अर्मिन वांद्रेवाला यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
  • सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱयांमुळेच कोरोनाचा प्रसार वाढल्याचे याचिकेत म्हटले आहे. यावर झालेल्या सुनावणीदरम्यान पालिका बीट मार्शल, पोलिसांच्या माध्यमातून सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱयांवर कारवाई करीत असल्याचे सांगण्यात आले.
  • यावर न्यायालयाने 1200 रुपये दंड का आकारत नाही, अशी विचारणा पालिकेला करतानाच सध्याच्या जमान्यात 200 रुपयांना पिंमत तरी आहे का! आपला महसूल का बुडवता, असा सवालही केला. तसेच व्यापक जनजागृती करण्याचे निर्देशही दिले आहेत.

विनामास्क फिरणाऱयांकडून 53 कोटींचा दंड वसूल!

मुंबईत मार्च 2020 मध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर 20 एप्रिलपासून विनामास्क फिरणाऱयांवर कारवाई करण्यात येत आहे. मुंबई महानगरपालिका, पोलीस व क्लीन अप मार्शल यांच्याकडून सुरू असणाऱया संयुक्त कारवाईत सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱया 26 लाख 40 हजार 190 जणांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईतून तब्बल 53 कोटी 19 लाख 42 हजार 800 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.