लक्ष विचलित करून चोरट्यांनी मोबाईल हिसकाविला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तुमचे पैसे खाली पडले आहेत, अशी बतावणी करून दुचाकीस्वार चोरट्यांनी तरूणाचे लक्ष विचलित करून त्यांच्या हातातील 7 हजार रूपये किंमतीचा मोबाईल हिसकावून नेल्याची घटना सोमवारी सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास सहकारनगरमध्ये घडली. याप्रकरणी पंकज क्षत्रिय (48, रा. सहकारनगर) यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पंकज फळे खरेदी करण्यासाठी सहकारनगर परिसरात गेले होते. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी त्यांना तुमचे पैसे खाली पडले आहेत, अशी बतावणी करून लक्ष विचलित केले. त्यामुळे पंकज पैशांचे पाकिट पाहू लागले असता, दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्याकडील 7 हजारांचा मोबाईल हिसकावून पळ काढला. याप्रकरणी तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार तपास करीत आहेत.