मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचा इंडस्ट्रीला रामराम, टॉपलेस योगामुळे आलेली चर्चेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेत्री आश्का गरोडिया ही लग्न झाल्यापासून मालिकांपासून लांब आहे. आश्का ही तिचा पती ब्रेंट याच्यासोबत गोव्यात राहत आहे. तिथे ब्रेंटचे योगा सेंटर असून आश्का देखील बऱ्याचदा योगा करतानाचे तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

कुसुम, सात फेरे, सिंदूर तेरे नाम का, कयामत, क्युँकी सास भी कभी बहू थी, पिया का घर, कही तो होगा, डायन अशा अनेक मालिकांमध्ये आश्काने काम केलेले आहे. आश्काने बिग बॉस व खतरों के खिलाडी या रिअॅलिटी शोमध्येही भाग घेतला होता.

‘व्यवसाय हा माझ्या रक्तात आहे. अचानक आयुष्यात वेगळे वळण आले व मी अभिनय क्षेत्रात आले. आता अभिनयाला अलविदा करायची वेळ आली आहे. हा माझा निर्णय कायमचा आहे की नाही हे पुढे जाऊन समजेल. पण माझे जे व्यावसायिक होण्याचे स्वप्न आहे ते मी आता पूर्ण करेन’, असे आश्काने सांगितले आहे.