
लोटे एमआयडीसीतील कंपन्यामध्ये आग लागण्याचे सत्र सुरूच आहे. एमआयडीसीतील एम.आर.फार्मा या कंपनीला बुधवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. याआगीत कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या आगीत जीवीतहानी झालेली नाही.
एम.आर.फार्मा कंपनीत बुधवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास रिॲक्टरचा स्फोट होऊन आग लागली. स्फोट होताच धुराचे लोळ हवेत पसरले. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला.उशीरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते.एक-दीड तासानंतर आग विझवण्यात आली.सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. स्फोटामुळे कंपनीचे नुकसान झाले आहे.
लोटे एमआयडीसीत स्फोट आणि आग लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. घरडा केमिकल्स, सुप्रिया केमिकल्स, समर्थ इंजिनियरिंग कंपन्यामध्ये यापूर्वी स्फोटाच्या घटना घडल्या होत्या. त्यात काही कामगारांना जीव गमवावा लागला होता. लोटे एमआयडीसीतील स्फोटाच्या घटना वाढत असल्याने कामगारांमध्ये भीतीचे वातावरण आहे.



























































