गुड न्यूज- कोविशिल्ड 100 रुपयांनी स्वस्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाने ‘कोविशिल्ड’ लसीचे दर 100 रुपयांनी कमी केले आहेत. पूर्वी लसीचा प्रति डोस 400 रुपयांना राज्यसरकारांना मिळेल, असे जाहीर केले होते. आता 300 रुपयांना राज्यांना मिळणार आहे. ‘सिरम’चे सीईओ आदर पुनावाला यांनी आज ट्विटद्वारे ही माहिती दिली.

100 रुपयांनी लस स्वस्त झाल्यामुळे राज्यांचे हजारो कोटी रुपये वाचतील. तसेच जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करून अनेकांचे प्राण वाचविता येतील, असे पुनावाला यांनी म्हटले आहे.

खासगी रुग्णालयात 600 रुपयांनाच

1 मे पासून देशभरात 18 वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी ‘सिरम’ने ‘कोविशिल्ड’ लसीचा प्रती डोस राज्यांना 400 रुपयांना तर खासगी रुग्णालयांसाठी 600 रुपयांना दिला जाईल, असे जाहीर केले होते. आता राज्यांसाठी 300 रुपये प्रति डोस ही लस दिली  जाईल. मात्र, खासगी रुग्णालयांत नागरिकांना 600 रुपये द्यावे लागणार आहेत.