अंबाती रायुडूच्या सिक्सरने फोडला मुंबई इंडियन्सचा फ्रिज, पाहा व्हिडीओ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चेन्नई सुपरकिंग्ज व मुंबई इंडियन्सने झालेल्या सामन्यात दोन्ही संघाच्या फलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली. दोन्ही संघाकडून मोठी धावसंख्या उभारण्यात आली होती. या सामन्यातील फलंदाजांची फटकेबाजी प्रेक्षकांसाठी पर्वणी होती. मोईल अली, अंबाती रायुडू, रविंद्र जाडेजा, रोहीत शर्मा, कॅरेन पोलार्ड, हार्दीक शर्मा यांनी एका पेक्षा एक जबरदस्त षटकार व चौकार मारले.

सामन्यात षटकार व चौकारांचा पाऊस पडत असताना अंबाती रायुडूने मारलेल्या एका षटकारामुळे मुंबई इंडियन्सचे नुकसान झाले. अंबातीच्या सिक्सरमुळे मुंबई इंडियन्सतचा डगआऊटमध्ये ठेवलेला फ्रिजची काच फुटली.