
काँग्रेसचे ग्रामीण भागातील ज्येष्ठ नेते व माजी खासदार दामू शिंगडा यांचे आज कोरोनामुळे वसईतील खासगी रुग्णालयात निधन झाले. ते 68 वर्षांचे होते. पालघर जिह्यातील आदिवासींचे प्रश्न लोकसभेत मांडणारा अभ्यासू नेता यानिमित्ताने हरपला आहे. तब्बल पाच वेळा शिंगडा यांनी डहाणू लोकसभा मतदारसंघाचे समर्थपणे प्रतिनिधित्व केले होते.
दामू शिंगडा यांना कोरोनाची लागण झाल्याने खासगी रुग्णालयात दाखल केले होते. पण उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, पत्नी व नातवंडे असा परिवार आहे. काँग्रेसशी एकनिष्ठ असणारे दामू शिंगडा हे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचे विश्वासू सहकारी होते.





























































