
कोरोनाला रोखण्यासाठी गोरेगावमधील नेस्को कोरोना केंद्राची क्षमता वाढवण्यात आली असून आज दुसऱया टप्प्यात आणखी 1 हजार 500 बेड्सचे लोकार्पण उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. यात एक हजार ऑक्सिजन बेडसह इतर सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामुळे नेस्कोची एकूण बेड क्षमता वाढून तीन हजार 700 झाली आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने पाच जम्बो कोरोना केंद्रे सुरू केली असून यात नेस्को मैदानात सुरू केलेल्या कोरोना केंद्राचाही समावेश आहे. नेस्को कोरोना पेंद्राच्या पहिल्या टप्प्यामध्ये एकूण 2 हजार 200 रुग्णशय्या कार्यान्वित करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये गंभीर रुग्णांसाठी 200 बेड्स तर 300 ऑक्सिजन बेड्स होते. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज नेस्कोतील ई-हॉलमध्ये दीड हजार बेड्सचे लोकार्पण केले. यात एक हजार बेड्स हे ऑक्सिजन बेड्स आहेत तर उर्वरित 500 हे सर्वसाधारण बेड्स आहेत. प्रत्येक बेडजवळ पंखा, लॉकर व खुर्ची पुरविण्यात आली आहे. आज 200 बेड्स कार्यान्वित करण्यात आले असून टप्प्याटप्प्याने सर्व बेड्स कार्यान्वित केले जाणार आहेत. यावेळी राज्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, अतिरिक्त महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, उपआयुक्त संजोग कबरे, अधिष्ठाता डॉ. नीलम अंद्राडे, अधिष्ठाता डॉ. राजेश डेरे व अतिरिक्त अधिष्ठाता डॉ. नितीन सलागरे आदी उपस्थित होते.
अशा आहेत सुविधा
- ‘ई’ सभागृहात एकूण सहा कक्ष आहेत. प्रत्येक कक्षामध्ये 250 ते 300 बेड्सची क्षमता आहे. सर्व कक्षांमध्ये पेंद्रीकृत वातानुकूलन सुविधा आहे.
- प्रत्येक कक्षामध्ये 2 नर्सिंग स्टेशन, 1 अन्न वितरण विभाग, 1 अग्नी नियंत्रण कक्ष, त्याचबरोबर 24 तास कार्यरत फार्मसी काwन्सिलिंग रूम, रुग्णांच्या नातेवाईकांना माहिती पुरविण्यासाठी नियंत्रण कक्षदेखील आहे.
- एकूण 8 नोंदणी कक्ष, 1 निरीक्षण कक्ष (10 रुग्णशय्या), 1 क्ष-किरण विभाग सुरू करण्यात आला आहे.
- या नवीन सुविधेसाठी एकूण 1 हजार 100 कर्मचारी नेमण्यात आले आहेत. त्यात 50 सीनियर कन्सल्टंट, 160 निवासी वैद्यकीय अधिकारी, 320 परिचारिका, 480 रुग्णसेवा सहाय्यक आणि 90 तांत्रिक कर्मचाऱयांचा समावेश आहे.





























































