कितने मास्क सेफ है… पुरे दो सरकार! ‘डबल मास्क’संदर्भात पोलिसांची हटके जनजागृती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एकावर एक असे दोन मास्क परिधान केल्यानेच कोरोनापासून बऱयापैकी बचाव होतो, असे नुकतेच आरोग्य तज्ञांनी सांगितले आहे. डबल मास्कसंदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी मुंबई पोलिसांनी सोशल मीडियावर हटके पोस्ट केली आहे. पोलिसांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये फॅशन ट्रेंड आणि सेफ्टी ट्रेंड असे दोन विभाग दिसत आहेत. 1975मध्ये डेनिम जीन्सवर डेनिम शर्ट घालण्याची फॅशन होती तर 2021च्या सेफ्टी ट्रेंडमध्ये कोरोनापासून बचावासाठी मास्कवर मास्क घालणे हाच सुरक्षित पर्याय आहे असा या पोस्टरद्वारे संदेश देण्यात आला आहे. या पोस्टसोबत ‘शोले’तील लोकप्रिय डायलॉगचा आधार घेत ‘कितने मास्क सेफ है… पुरे दो सरकार’ अशी कॅप्शन देण्यात आली आहे.