कोरोना चाचणीशिवाय आंतरराज्यीय प्रवासाला मुभा, सरकारचे नियम शिथिल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चाचणी प्रयोगशाळांवरील वाढता ताण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने कोरोना चाचण्यांबाबतचे नियम शिथिल केले आहेत. आता निरोगी व्यक्तींना आरटीपीसीआर चाचणी न करताही आंतरराज्यीय प्रवास करता येणार आहे. त्याचप्रमाणे कोरोनाबाधित बरे झाल्यानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देताना त्यांची चाचणी करण्याची गरज नाही, असेही केंद्र सरकारने म्हटले आहे.

कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे देशातील अडीच हजार चाचणी प्रयोगशाळांवर कामाचा ताण वाढला आहे. तो कमी करण्यासाठी केंद्र सरकारने कोरोनासंदर्भातील नियम शिथिल केले आहेत. सर्व राज्य सरकारांना त्याबाबत परिपत्रक पाठवण्यात आले आहे. यापुढे रॅपिड चाचणी किंवा आरटीपीसीआर चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आढळणाऱया व्यक्तींची पुन्हा चाचणी करण्याची गरज नाही, असेही या परिपत्रकात नमूद आहे.