
फ्रांस वाहन उत्पादक कंपनी Citroen ने हिंदुस्थानात आपली Ami Cargo कार लॉन्च केली आहे. ही कार इंटरनेटवर चांगलीच चर्चेत आली आहे. ही एक इलेक्ट्रिक कार असून कंपनीने यात जबरदस्त फीचर्स दिले आहेत. ही एक टू सीटर कार आहे. आज आपण याच कारबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

Citroen ने हिंदुस्थानात या मिनी कारची किंमत 7,390 यूरो म्हणजेच जवळपास 6.55 लाख रुपये इतकी ठेवली आहे. Citroen Ami Cargo ही कार याच वर्षी विक्रीसाठीही उपलब्ध होणार आहे. या मायक्रो कारमध्ये 5.5 केडब्ल्यूची बॅटरी देण्यात आली आहे. जी एका चार्जमध्ये 75 किलोमीटरचा पल्ला गाठते. याची लांबी फक्त 9.9 फूट आहे आणि याची टॉप स्पीड 28 प्रति तास इतकी आहे.

Citroen ने ए 4 दस्तऐवज किंवा टॅब्लेट स्पेससाठी काढता येण्याजोगा शेल्फ उपलब्ध करुन दिला आहे. हा शेल्फ 40 किलो पर्यंतच्या भार सहन करू शकतो. तसेच या कारची एकूण लोड क्षमता 400 लिटरपेक्षा जास्त आहे. अमीला अधिक प्रभावी बनवण्यास



























































